जेएसएममध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती, जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग आणि आयबीएस बिझनेस स्कूल, वाशी, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कला, वाणिज्य आणि विज्ञान या सर्व विद्याशाखांसाठी जयवंतराव केळुसकर हॉल, जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला.

जेएसएमचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आयबीएसचे वरिष्ठ व्यवस्थापक राहुल तिवारी, प्रा. डॉ. वनिता जोशी आदी उपस्थित होते. प्रा.आशुतोष मेहंदळे यांनी प्रास्ताविक करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले. डॉ.सोनाली पाटील यांनी डॉ.वनिता जोशी यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमासाठी 56 प्राध्यापक उपस्थित होते. डॉ.वनिता जोशी यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये ङ्गवर्क एथिक्स अँड अ‍ॅडॉप्टिंग डिजिटल टेक्नॉलॉजीफ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले.

पहिल्या सत्रात आचारसंहिता, चारित्र्य, देहबोली, वक्तशीरपणा, समर्पण, कार्यसंस्कृती इत्यादी नैतिकतेच्या अनेक पैलूंची चर्चा करून दुसर्‍या सत्रात शैक्षणिक संस्थांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणेफ या विषयावर चर्चा करताना ङचड, थशलएु, चेववश्रश चा वापर आणि इतर अनेक तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी दिली. प्राध्यापकांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. प्रा.वर्षा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version