शरद पवार यांची आयोगापुढे माहिती
। मुंबई । प्रतिनिधी ।
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी सध्या राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची चौकशी आयोगापुढं चौकशी सुरु आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली. यावेळी त्यांनी या हिंसाचाराला तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार असल्याचं सूचकपणे म्हटलं आहे. पवार म्हणाले, जे काही घडलं ते दुर्दैवी होत. अशी परिस्थिती नियंत्रित करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची होती, पण त्यांनी यामध्ये कुचराई केली. हे वेळीच थांबवता आलं असतं पण थांबवलं गेलं नाही. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस जबाबदार असतात. कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची होती, त्यांनी योग्यवेळी काळजी घ्यायला हवी होती. पण त्यांनी योग्य वेळी कारवाई न करता त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यामुळं ही दंगल झाल्याचा दावा पवारांनी चौकशी आयोगासमोर केला.
कोरेगाव भीमा हिंसाचार झाला त्यावेळी 2018 मध्ये राज्यात फडणवीस सरकार सत्तेत होतं. तसेच यावेळी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडेच होती. त्यामुळं पोलीस प्रशासन या घटनेला जबाबदार असल्यानं सूचकपणे फडणवीसच यासाठी जबाबदार आहेत. – शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष







