| पनवेल | प्रतिनिधी |
राज्यात सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे एकीकडे भाज्यांच्या दरात वाढ झाली असून, भाज्यांनी शंभरी गाठली आहे. तर, दुसरीकडे डाळींच्या दरात घसरण झाल्यामुळे गृहिणींना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून डाळींच्या दरात घसरण होत आहे. तूर, चणाडाळ, मूग, मसूर आणि हरभरा यांसारख्या प्रमुख डाळींचे दर 5 ते 15 रुपयांपर्यंत घसरले आहेत. या घसरणीमुळे किरकोळ ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यंदा डाळींच्या उत्पादनात वाढ झाली आहे. तर, यंदा चांगल्या पावसामुळे डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. उत्पादन वाढल्यामुळे मालाची आवकही बाजारात वाढली आहे. त्यामुळे डाळींच्या दरात घसरण होत आहे.
डाळींच्या दरात घसरण
