। अलिबाग । प्रतिनिधी ।
आईसह पत्नी, मुलगा यांच्यावर जीवघेणा हल्ला करणार्या नराधमाला अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. बोरपाडा येथील चंद्रकांत मानकर याने कौटूबिक वादातून आईसह पत्नी व मुलाला बेदम मारहाण केली होती. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली.
बापाकडून होणार्या छळाला कंटाळून अखेर मुलाने घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला. मुलाच्या तक्रारीनूसार पोलिसांनी तपास केला. तसेच आईसह पत्नी आणि मुलाला मारणार्या त्या नराधमाला ताब्यात घेतले.