पनवेल | वार्ताहर |
सिंधुदूर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल यांच्या कौटुंबिक स्नेहसंमेलनाला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी भेट दिली. संमेलनात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते व एक कौटुंबिक रित्या विविध कार्यक्रमाचे खूप सुंदर आयोजन केले होते. याप्रसंगी सर्व उपस्थित सिंधुदुर्ग रहीवासीयांना प्रीतम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिले. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस, नगरसेवक श्री.गणेश कडू, त्यांचे सहकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे सदस्य ानंद धुरी, मंगेश अपराज उपस्थित होते.