अफगाणिस्तावर भूकबळीचे सावट

डब्ल्यूएचओकडून चिंता व्यक्त
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केला असून, नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत. त्यामुळे देशात मानवीय संकट निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनी अफगाणिस्तानबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये आरोग्य समस्येसह भूकबळी आणि इतर आजारांचा उल्लेख करण्यात आला आहे. याचा थेट प्रभाव एक कोटींपेक्षा अधिक लहान मुले आणि महिलांवर पडणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अफगाणिस्तानमधील आरोग्य स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशात असंख्य लोक संघर्षामुळे भूक आणि इतर आजारांच्या कचाट्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. देशातील अर्ध्या लोकसंख्येला मदतीची गरज आहे, यात एक कोटींपेक्षा अधिक लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्र एजेन्सीचे प्रवक्ता तारिक जसारेविक यांनी म्हटलंय की, अफगाणिस्तानमधील स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. महिला आरोग्य कर्मचारी महिलांपर्यंत पोहोचतील याची निश्‍चिती करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही अडचणीशिवाय आरोग्य सुविधा सुरु ठेवणे गरजेचं आहे.

मदतीचे आवाहन
अफगाणिस्तानमधील स्थिती खूप नाजूक बनली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला निरंतर मदत देणे आवश्यक असल्याचं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे. दरम्यान, अफगाण नागरिकांच्या मदतीसाठी अनेक देश पुढे येताना दिसत आहेत. अनेकांनी अफगाण नागरिकांना आश्रय देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना अफगाणिस्तान सोडायचा आहे, अशांना सर्वोतपरी मदत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Exit mobile version