। मुंबई । प्रतिनिधी ।
‘आजच्या ठळक बातम्या’ सांगणारा भारदस्त आवाज म्हणजेच प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन झाले आहे. आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि गेल्या चार दशकाहून अधिक काळ दूरदर्शनवर बातमीदारी करणाऱ्या प्रदिप भिडेंचा आवाज हरपला. प्रदीप भिडे यांनी ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरु केली. त्या माध्यमातून त्यांनी जाहिरात, माहितीपट आणि लघुपट यावर काम करत आपला ठसा उमटवला. प्रदिप भिडे यांनी आतापर्यंत सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निवेदन केले आहे. त्यांच्या निधनावर माध्यम क्षेत्र आणि इतर क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.