रविंद्र भोईर यांचा निरोप समारंभ

| पाताळगंगा | वार्ताहर |

खालापूर तालुक्यात गेली 26 वर्ष विद्यार्थ्यांना ज्ञानांचे धडे देणाऱ्या शिक्षक रविंद्र भोईर यांचा निरोप समारंभ पार पडला. अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद, शाळा नागाव-बागमळा येथे ते कार्यरत होते. राजिप शाळा कुंभीवली येथे कार्यक्रम संपन्न झाला. 1998 साली ते शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. खरसुंडी येथे 4 वर्ष, इसांबे येथे 10 वर्ष, वावंढळ येथे 7 वर्ष अशी त्यांची कारकिर्द आहे.

रविंद्र भोईर शिक्षक समवेत उत्तम व्यख्याते म्हणून प्रचलित आहेत. त्याचबरोबर ते सुत्रसंचालकही होते. विवध माध्यमांची आवड आणि शाळेमध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी ते सातत्याने जागृत होते. आजचे विद्यार्थी भविष्याचा आधार स्तंभ या उद्दात विचारांतून त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले गेले आहेत. या कार्यक्रामाचे आयोजन राजिप शाळा कुंभिवली मुख्याध्यापक बाळू बाबू चव्हाण यांनी केले. तसेच त्यांच्या पत्नी चेतना भोईर या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांकडून हिंदवी स्वराज्यांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. शाळेकडून सन्मान चिन्ह, देण्यात आले.
तसेच भोईर यांनी अनेक उपक्रम राबवून अनेक शाळेमध्ये अमुलाग्र बदल घडविले. सीएसआर फंडातून शाळा सक्षम बनविली, सामाजिक शैक्षणिक 250 हुन अधिक उपक्रम राबविले. विविध स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपुलकीचे घर निर्माण केले होते.

Exit mobile version