पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांना निरोप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
खालापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांची तडकाफडकी बदली झाली असून, पालघर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांचे अभिनंदन आणि निरोप समारंभाचा कार्यक्रम सोमवारी (दि.22) खोपोलीतील लायन्स क्लब संचलित डॉ. रामहरी धोटे सभागृहात संपन्न झाला. यावेळी खालापूर तालुका पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या निरीक्षक बाळा कुंभार यांचे स्वागत आणि पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी खोपोली शहर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारून एक वर्षाचा कालावधी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, सुनील पाटील, शिवानी जंगम, राजेश पारठे, राजिप माजी उपाध्यक्ष भाई शिंदे, नरेंद्र गायकवाड, रवी रोकडे, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे माजी अध्यक्ष महेश राठी, पोलीस पाटील संघटनेचे पंकज देशमुख, श्‍वेेता मनवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ साठेलकर यांनी, तर सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले.

Exit mobile version