| रसायनी | प्रतिनिधी |
सवणे येथे शेतात गायी शिरल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सत्यवान गोपाळ देशमुख (रा. सवणे, आपट्याचा दांड) हे आपल्या शेतात भात झोडणी करत असताना, त्यांचे मावस भाऊ सुरेश रघुनाथ देशमुख (रा. सवणे) यांच्या तीन गायी तीन ते चार वेळा सत्यवान देशमुख यांच्या शेतात शिरल्या. याबाबत सत्यवान देशमुख यांनी सुरेश देशमुख यांना सांगितले. याचा राग मनात धरून सुरेश देशमुख यांनी सत्यवान देशमुख यांना लाकडी काठीने पाठीवर, हातापायांवर मारहाण केली. त्यांना जमिनीवर पाडून त्यांच्या अंगावर बसून हाता-बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ करत दमदाटी केली. या घटनेनंतर सत्यवान देशमुख यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सुरेश देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






