कायपण करा पण ‘हा’ प्रकल्प येऊ देणार नाही…

बल्क ड्रग पार्कविरोधात शेतकरी आक्रमक; रोहा, मुरुड तालुक्यातील प्रकल्पाला विरोध
। चणेरा । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरुड तालुक्यातील 17 गावांमध्ये केंद्र व राज्य सरकारने मंजूर केलेला सिडकोने टाकलेल्या प्रकल्पाबाबत शेतकर्‍यांनी मागील काही दिवसांपासून विरोध दर्शवला होता. अखेरीस सिडको प्रकल्प रद्द होऊन त्या बदली बल्क ड्रग पार्क नावाचा औद्योगिक प्रकल्प येत आहे. या प्रकल्पास शेतकरी व भूमीपुत्रांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाबाबत शेतकर्‍यांसाठी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता शासनामार्फत लादला जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून करण्यात आला आहे.

या प्रकल्पाकरिता येथील परिसरातील एकूण 4309 हेक्टर आर क्षेत्रफळ लागत असून, त्यापैकी 1995 हेक्टर आर क्षेत्रफळ संपादनासाठी अधिसूचित करण्यात आले आहे. प्रस्तावित 1995 हेक्टर आर क्षेत्रापैकी 321 हेक्टर आर क्षेत्र सरकारी असून, 1674 हेक्टर आर क्षेत्र खासगी आहे. येथील भूमीपुत्रांच्या हक्काच्या शेतजमीन आहेत. पिढ्यान् पिढ्या येथील भूमीपुत्र प्रामुख्याने भातपीक घेतात, तसेच बागायती व फळ उत्पादनसुद्धा घेतले जाते. मात्र, औद्योगिक बल्क ड्रग पार्क प्रकल्प येत असल्याने शेतकरी व भूमीपुत्रांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा प्रकल्प शासनाने 17 महिन्यांत येथील भूमीपुत्रांवर लादण्याचा घाट घातला आहे. येथील प्रकल्पाबाबत शेतकर्‍यांसाठी कोणत्या ही प्रकारे चर्चा न करता शासनामार्फत घे घाई होत असल्याचे बोलले जात आहे.

परिणामी, शेतकरी, जमीनदारांनी प्रकल्पास पुन्हा एकदा विरोध दर्शवत, रोहा तालुक्यातील न्हावे, नवखार, सोनखार या गावांतील भूमीपुत्रांनी तसेच शेतकर्‍यांनी संघटित होऊन संघर्ष करण्याकरिता ते एकटावले व त्यांनी येथील स्थापन केलेल्या समितीला बल्क ड्रग पार्क (एमआयडीसी) न्हावे, नवखार, सोनखार प्रकल्पग्रस्त संघटना असे नाव दिले आहे. स्थानिक पातळीवर या प्रकल्पाबाबात बैठका घेऊन त्यात चर्चा करून त्याचे दुष्परिणाम समोर आणत आहेत, ते म्हणजे औद्योगिक प्रकल्प आल्यास येथील नैसर्गिक सौंदर्य नष्ट होणार, शिवाय पर्यावरणाचा र्‍हाससुद्धा होऊ शकतो. या बाबीसुद्धा विचारात घेणे गरजेचे आहे.

येथील स्थापन केलेल्या समितीमध्ये अध्यक्ष प्रमोद कासकर, उपाध्यक्ष मिथुन सर्लेकर, तसेच खजिनदार महादेव शाबासकर, कार्याध्यक्ष-कमलाकर डबीर, सल्लागार सुरेश पोसतांडेल, सचिव सदानंद पाटील आदी कार्यकरिणी स्थापन करुन प्रकल्पास तीव्र विरोध दर्शवत आहेत.

Exit mobile version