शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून फसवणूक

। महाड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाड तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 2025 वर्ष संपत आले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिक विम्याचा एकही रुपया परत मिळालेला नाही. नुकसान भरपाईची वाट पाहत असताना, विमा कंपनी मात्र पुढील वर्षाचा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी तगादा लावत आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात महाड तालुका ऑरगॅनिक ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि., महाड आक्रमक भूमिका घेत असून, शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आधीचा विमा दिला नाही, तर पुढील वर्षाचा हप्ता कशासाठी? शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा अडकला आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Exit mobile version