शेतकरी पीक विम्यापासून वंचित

आंबा पिकाचे नुकसान
। नेरळ । प्रतिनिधी ।
शासन आंबा पिकाच्या नुकसानीसाठी पीक विमा योजना जाहीर करीत असते. गतवर्षी विमा काढलेल्या शेतकर्‍यांना आंबा पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. या शेतकर्‍यांना मागील वर्षाबरोबर यावर्षची भरपाई मिळाली नाही. दरम्यान, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कर्जत तालुक्यात भातपीक घेणारे शेतकरी यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात फळ बागायती करणारे शेतकरी देखील आहेत. अशा शेतकर्‍यांच्या आंबा आणि अन्य फळ पिकांच्या उत्पन्नाबद्दल कोणताही शेतकरी ठामपणे अवलंबून नसतो. कारण मागील काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात होणारे बदल हे प्रामुख्याने फळबागायतदार यांच्या पिकांची नुकसानी करणारे ठरत आहेत. हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट यांचा संभाव्य धोका वाढू लागला आहे. त्यात मागील वर्षी सातत्याने पिकांचे गारपीट आणि अवकाळी पाऊस यांनी फळपिकांचे नुकसान केले आहे. हे नुकसान लक्षात घेता शेतकर्‍याकडून पीकविमा काढला जात असतो. 2020 मध्ये फळबाग शेतकर्‍यांनी कर्जत तालुक्यात 880 शेतकर्‍यांनी आपल्या बागायतीचे हवामान बदलामुळे नुकसान होऊ नये रस्ताही पीकविमा काढला होता. एक हेक्टरी उत्पादनासाठी 7000 रुपये हे नियमित पीकविमा स्वरूपात काढला होता. मागील वर्षी गारपीट आणि हवामान बदलाचा मोठा फटका कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला आणि त्यात शेतकर्‍यांच्या बागायती मधून जेमतेम 10 टक्के माल सुस्थितीत शेतकर्‍यांच्या हाताशी लागला आहे.

Exit mobile version