नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतदार आर्थिक संकटात; मागील वर्षीची भरपाई जमा न झाल्यामुळे नाराजी
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील आंबा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सन 2025-26 सालासाठी विमा भरण्याची प्रक्रिया शासनाकडून चालू झालेली आहे. शेतकऱ्यांना मागील नुकसान भरपाई न मिळाली नसून शासनाने पुढील वर्षात होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी विमा काढण्याची घाई शेतकऱ्यांच्या मागे लावली आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सुर उमठत आहे.
अगोदरच शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडला असतांना या शेतकऱ्यांना आणखीन अडचणीत आणण्याचे काम हे सरकार करत असल्याचा
आरोप शेतकऱ्यांकडून होतांना दिसत आहे. शेतकऱ्यांंनी सन 2014-25 साली आंबा पीक विम्याचे पैसे भरलेले असून, त्यांच्या या पिकाचे झालेल्या नुकसानीचे फक्त पंचनामे झाले असले तरी त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई आजतागायत मिळालेली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असतांना पुढील वर्षासाठी शेतकऱ्यांने पुन्हा स्वतःच्या खिशातून पैसे भरून विमा काढावा आणि पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार या अपेक्षेने खिशात असलेल्या पैशाची उधळण करायची का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
आमच्या आंबा बागेचा मागील वर्षी आंबा पीक विमा उतरविला आहे, त्यावेळी अवकाळी पावसाने आमच्या आंबा पिकाचे नुकसान झाले होते. याबाबत आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना कळविले होते. तसा नुकसान पिकाचा पंचनामा झाला आहे. मात्र, आज पर्यंत पिक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई दिलेली नाही.
मंगेश धामनसे शेतकरी,
खानाव-खालापूर
हवामान आधारित पीक विमा योजना अंतर्गत आंबा पिक विम्याचे पैसे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान बँकेमध्ये जमा होतील. मात्र शेतकरी वर्गांनी आंबा फळपिका विमा काढणे गरजेचे आहे. सदर आंबा पीक विम्याचे पैसे भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत असल्यांचे सांगितले.
प्रशांत कदम
सहाय्यक कृषी अधिकारी खालापूर







