भुमिपुत्रांच्या प्रलंबित प्रश्‍नासाठी शेतकर्‍यांची कपिल पाटीलांची भेट

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत येथील रिलायन्स इथेनगँस पाइपलाईन प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची जासई येथे भेट घेऊन भुमिपुत्रांच्या या प्रलंबित प्रश्‍नाबाबत लक्ष घालून न्याय मिळवून देण्यासाठी निवेदनाव्दारे विनंती केली आहे. याप्रसंगी आंदोलनाची धुरा सांभाळणारे राजेश भगत तसेच शेतकरी केशव तरे, बाळा शेकटे, रघुनाथ तरे, उमेश राणे, कृष्णा शिंगे, गणेश तरे, बबन तरे आदी उपस्थित होते.

कर्जत येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी गेल्या तीन वर्षापासून विविध स्तरावर पाठपुरावा करत आहेत. जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी शेतक-यांनी अनेक उपोषण, उग्र आंदोलने केली. पंरतू, आजपर्यत याप्रकरणी ना सक्षम अधिका-याचीही नेमणूक झाली वा ना शेतकर्‍यांना मोबदला मिळाला. त्यामुळे याविषयी कुठलीही हालचाल होत नसल्याचे दिसून आले आहे. अनेकदा, रिलायन्ससोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून झाला पंरंतू, कोविड संसर्गाचे कारण पुढे करून टाळाटाळ केल्याचे दिसून आले आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकरी केशव तरे यांनी सांगितले की, आमचा हा लढा येथील भुमिपुत्र म्हणून सुरू आहे आणि गेल्या तीन वर्षापासून आम्ही आमच्या न्यायासाठी लढत आहोत. यापुर्वी आम्ही

रिलायन्सने कशाप्रकारे फसवणूक केली आहे ही पुराव्यासहीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या आमच्या लढ्यात आमदार प्रशांत ठाकूर हे आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले असून जोपर्यत शेतक-यांना न्याय मिळत नाही तोपर्यत हा लढा सुरू राहिल असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाने केंद्रीय मंत्रीमहोदय यांची भेट घेऊन याविषयी केद्रींय स्तरावर पाठपुरावा करून कर्जत येथील भुमिपुत्रांना न्याय मिळवून दयावा ही विनंती आम्ही सर्व शेतक-यांनी केली आणि त्यास खुप आश्‍वासक प्रतिसाद मिळाला आहे.

Exit mobile version