गेलच्या गॅस पाइपलाइनला शेतकर्‍यांचा विरोध

| उरण | वार्ताहर |

गेल इंडिया कंपनीच्या प्रोपेन पाईपलाईनला शेतकर्‍यांचा एकमुखाने विरोध. शेतकर्‍यांच्या हरकत अर्जावर गेल इंडियाकडून जेएनपीटी येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी हा विरोध दर्शविण्यात आला. यावेळी गेल इंडियाचे अधिकारी संदीप शर्मा तसेच उपजिल्हाधिकारी अश्‍विनी पाटील उपस्थित होत्या.

रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील विविध गावामधून गेल इंडिया कंपनीकडून प्रोपेन पाईपलाईन तसेच पैट्रोलियम व खनिज पाईप लाईन प्रकल्प जात आहे. या प्रकल्पासंदर्भात दि.18 शेतकर्‍यांच्या हरकत अर्जावर गेल इंडियाकडून जेएनपीटी येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीत गेल इंडिया अधिकारी संदीप शर्मा तसेच उपजिल्हाधिकारी अश्‍विनी पाटील उपस्थित होत्या. तसेच उरण, पनवेल, पेण व अलिबाग मधून बहुसंख्य शेतकर्‍यांची उपस्थिती होती.

या सुनावणीत सर्व तालुक्यातील शेतकर्‍यांनी एकाच सुरात गेल इंडिया गॅस पाइपलाइन प्रकल्पास विरोध दर्शविला. सरकारने शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीमधून गॅस पाइपलाइन टाकल्यास शेतकर्‍यांच्या प्रचंड संघर्षांस सामोरे जावे लागेल. दरम्यान, शेतजमीनीतुन पाईपलाईन टाकल्यास आजूबाजूचे क्षेत्रदेखील लागवडी योग्य राहणार नाही. शेतकर्‍यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे भविष्यात संघर्ष करायला लागला तरी चालेल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version