| माणगाव | प्रतिनिधी |
ओला दुष्काळ जाहीर करा, पीक कर्ज माफ करा, सरसकट शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी सरकारकडे करीत माणगावात तालुका शेतकरी संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर सोमवारी (दि.10) विराट मोर्चाचे आयोजन संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव पवार व अनिल नवगणे, भागोजी डवले व संघटनेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
यावेळी शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन माणगाव तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार विपुल ढुमे यांना देण्यात आले. यावेळी मोर्चेकरांना आश्वासित करताना निवासी नायब तहसीलदार विपुल ढुमे यांनी आपल्या भावना आम्ही ऐकल्या असून, त्या भावना शासनापर्यंत पोहचवून त्यातून सकारात्मक यश मिळेल असे सांगितले. या मोर्चाला संघटनेचे सरपंच कदम, अशोक पाटील, सखाराम जाधव, वडेकर गुरुजी, नितीन वाघमारे, नितीन दसवते, सुभाष गुगळे, दिनेश गुगळे, सीताराम भोनकर, नामदेव शिंद, संदेश गुगळे, योगेश गुगळे, विलास गोठलं, बाळा मांजरे, प्रवीण बागवे, सुधाकर पालकर, अंजली पवार, विश्वंभर दांडेकर, सचिन सत्वे, कैलास पोवार, काशीराम पोवार, बाबू पाखुर्डे, चंद्रकांत सत्वे, नंदू वाढवळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच शेतकरी बांधव – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा
