कोर्लई | वार्ताहर |
शेतकर्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, ज्येष्ठ शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, शेतीसाठी व शेतीपूरक व्यवसायासाठी चार टक्के दराने कर्जपुरवठा करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत असून, संघटनेची मुरुड व अलिबाग तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येत आहे. यासाठी तालुक्यातील शेतकर्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे यांनी केले आहे.
रायगडमधील शेतकर्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तालुका पातळीवर कार्यकारिणी जाहीर करण्यात येत असून, आतापर्यंत रोहा, पेण, सुधागड, पाली, खोपोली, कर्जत, महाड, माणगाव, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच मुरुड व अलिबाग तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. तरी अधिक माहितीसाठी संघटनेचे कार्यकर्ते प्रमोद पाटील 9167113017 व 9923434144 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.