पीक विमा योजनेला शेतकर्‍यांचा प्रतिसाद

| नेरळ | प्रतिनिधी |

प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगामासाठी राबविली जात असून, यावर्षी अवघ्या एका रुपयात पीक विमा काढला जात आहे. बारणे येथे आयोजित पीक विमा नोंदणी मेळाव्याला असंख्य शेतकरी उपस्थित होते. 2023 साठी शेतकर्‍यांच्या खरीप हंगामातील शेतीचा विमा अवघ्या एक रुपयात काढला जात आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे शिबीर कर्जत तालुक्यातील बारणे येथे महालक्ष्मी मंदिरात आयोजित केले होते. ग्रामपंचायत सावेळे तसेच कृषी विभाग यांच्या माध्यमातून आयोजित पीक विमा नोंदणी शिबिराचे उद्घाटन पोलीस पाटील धनाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी दशरथ मुने यांनी शेतकर्‍यांनी एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला होता. याप्रसंगी सावेळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक केशव जाधव, कृषी सहाय्यक भोईरवाडी स्मिता गावडे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी सावेळे ग्रामपंचायतीमधील बारणे, भोईर वाडी, मार्केवाडी, तांबस, सापेले, धुळे वाडी येथील शेतकर्‍यांच्या पिकांचे विमा नोंदणी करण्यात आली.

Exit mobile version