उन्हामुळे वैरणीसाठी शेतकर्‍यांची भटकंती

पाळीव प्राण्यांवर उपासमारीचे संकट
। पाताळगंगा । वार्ताहर ।
ग्रामीण भागात जनावरांच्या वैरणीचा प्रश्‍न गंभीर बनला असल्याने शेतक-यांच्या संसाराला हातभार लावणारी पाळीव जनावरे या रणरणत्या उन्हाळयात सांभाळणे मोठ्या जोखमीचे झाले आहे. पावासाळा सुरु होण्यास काही दिवसांचा कालावधी लगेच वैरण निर्माण होत नसल्याने जनवारे जगविण्यासाठी पेंढा विकत घ्यावा लागत आहे. शेकडा आठशे ते हजार रुपये मोजावे लागत असल्याने चारा टंचाई ची झळ मुक्या प्राण्यांना बसत असून पेंढा आण्यासाठी बैलगाडी चा अधार घ्यावा लागत आहे.असे मत शेक-यांनी प्रतिनिधी बोलताना व्यक्त केले. सध्या माणसाच्या पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवणे मोठ्या कष्ठाचे होत असून,मुक्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करताना शेतक-याचा जीव मेटाकुटीला आला आहे.

शेतकर्‍याचा जास्तीजास्त वेळ शेतकामे करण्यापेक्षा जनावरांना चारा उपलब्ध करण्यामध्ये जात आहे. पुर्वी शेतात अथवा मैदानात जनावरे चरायला सोडले तरीही त्यांच्या खाद्याचा प्रश्‍न मार्गी लागत असे, मात्र आता वणवे लागत असल्यांने चा-याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.त्यातच पाणी टंचाई ची झळ निर्माण होत असल्यांने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.गाय, म्हैस, बैल वाढत्या महागाईमुळे जनावरांच्या खाद्यात ही मोठया प्रमाणात वाढ झाली असून, शेतक-यांना पशुधन सांभाळणे मोठ्या कष्टाचे होत आहे.

Exit mobile version