शेतकर्‍यांनी ई-केवायसी पूर्ण करावी

। अलिबाग । वार्ताहर ।
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत ई-केवायसी (श-घधउ) प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

Exit mobile version