। पोलादपूर । वार्ताहर ।
तालुक्यातील शेतकर्यांनी पोलादपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. पोलादपूर या संस्थेमध्येच शासकीय आधारभूत किमंत हमीभाव योजने अंतर्गत भातविक्री करून हमीभावाचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन मोहन शिंदे यांनी केले. पोलादपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातील आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन चेअरमन मोहन शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन अजित कंक, ढवळे, गणेश उतेकर, मनोहर पार्टे, रामदास सकपाळ, तसेच शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी शासकीय हमीभाव अ प्रतीच्या भातखरेदीसाठी 1 हजार 960 आणि ब प्रतिच्या भातखरेदीसाठी 1 हजार 940 रूपये हमीभाव देण्यात येणार आहेत.