| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ढाक, पोटल, पाली या भागात टोरंट कंपनी आपला वीज प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाला स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. पर्यावरण सुनावणीमध्ये देखील तीव्र विरोध निदर्शने करून देखील शेतकऱ्यांच्या विरोधकांकडे दुर्लक्ष करीत झाडे कापण्याची कामे सुरु करण्यात आली आहेत. दरम्यान, या भागातील शेतकऱ्यांनी पाली गावात बैठक घेऊन धरणाला विरोध करण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
टोरंट वीज प्रकल्पामुळे धरण परिसरात तब्बल 25 हजार झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे प्रदूषणाचा विषय समोर येणार असून, हे धरण व्हावे किंवा नाही याबाबत पर्यावरण विषयक जनसुनावणी कर्जत जवळील गौरकामत येथे घेण्यात आली. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र, ससाणे टोरंट कंपनीला रेड कार्पेट दाखवत हा प्रकल्प उभारण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी आहे, असा दाखल दिला. मुळात या प्रकल्पमुळे हजारो एकर वन जमीन वापरली जाणार असून, वन जमीन स्थानिक शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी दिली जात नाही. मग टोरंट कंपनीला 2100 हेकटर जमीन धरण बांधण्यासाठी कशी दिली जाते? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आयात या भागातील शेतकरी आक्रमक झाला असून, या शेतकऱ्यांनी धरणाला विरोध करण्यासाठी आरपारची लढाई पुकारली आहे.






