हमी भाव कायदा झाला तरच बळीराजा सुखावेल

राकेश टिकैत यांची बजेटवरुन नाराजी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.मात्र त्यावर शेतकरी संघटनांचे नेते राकेश टिकैत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एमएसपी हमी कायदा होत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांना कुठलाही फायदा होणार नाही. एमएसपी हमी कायदा झाल्यावर शेतकर्‍यांना लाभ मिळेल, असं राकेश टिकैत म्हणाले. शेतकर्‍यांच्या ऊसाची थकबाकीवर बोलताना ते म्हणाले की, ऊस कायद्यानुसार 14 दिवसांत पैसे न दिल्यास व्याज देण्याची तरतूद आहे. तरीही पैसे दिले जात नाही. गेल्या 5 वर्षांपासून उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार. पण भाजप सरकारनेही शेतकर्‍यांचे ऊसाचे पैसे थकवले. मार्च महिन्यापासून पैसे थकवले आहेत. सरकारने 23 पिकांना डिजिटलद्वारे जोडलं पाहिजे, असं टिकैत म्हणाले. कृषी क्षेत्रातील डिजिटलायजेशनला चालना देण्यात येणार आहे. यावर टिकैत यांनी टीका केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची एक मागणी आहे. शेतकर्‍यांची जी थकबाकी आहे, तिचेही डिजिटलायजेशन करून ती डिजिटली जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Exit mobile version