मुरुडमध्ये अवकाळीमुळे शेतकरी चिंतेत

Exif_JPEG_420

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यात काल रात्री अचानक थंड वारा सह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी व बागायतदार चिंताग्रस्त झाले असून आंबा बागायतदारांसमोर आंबा टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता भीती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी वातावरणात बद्दल होऊन अचानक जोरदार पाऊसाच्या सरी पडल्याने बागायतदारांची चिंतेत वाढ झाली आहे.

आंबा बागायदारांच्या बागेमधील आंबाना चांगला मोहोर येऊन लागला आहे. त्याबरोबर कलिंगड, वालाच्या, चवळीच्या शेंगा चांगला पीक येईल अशी आशा वाटत असतानाच अचानक अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या या अशेवर पाणी पेरले आहे. आंबा, कलिंगड, वाल आदींसह पिकांसह अन्य भाज्यांच्या लागवडीला अवकाळीचा फटका बसणार आहे. ढगाळ वातावरण असेच राहिल्यास मोहोरावर परिणाम होऊन शेती बागायदारांचे नुकसानीत येईल असा अंदाज मुरुड पंचक्रोशी भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.

Exit mobile version