अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंताग्रस्त

| पाताळगंगा | वार्ताहर |

गेले अनेक दिवस पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले. शेतामध्ये पाणी जास्त झाल्यामुळे भातशेती कुजली, तर डोंगराळ भागात असलेली शेती मातीमध्ये गाडली गेली आहे. पावसाच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे लागवड केलेले भात या प्रवाहाच्या दिशाने वाहून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

तालुक्यातील आजही भात लागवड करुन कुटुंबाचा उदारनिर्वाह याच माध्यमातून केला जात आहे. मात्र, दरवर्षी पावसाचे धुमशान सुरु असल्यामुळे भातशेतीला धोका निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.

Exit mobile version