आयसीसी क्रमवारीत सिराज अव्वल

| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आशिया कप फायनलमध्ये चमकदार कामगिरी केली. आपल्या घातक गोलंदाजीने त्याने श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

अवघ्या एका षटकात 4 विकेट घेत खळबळ माजवणाऱ्या या गोलंदाजाने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे. मोहम्मद सिराज आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. शेवटच्या क्रमवारीत त्याचेगुण 643 होते आणि तो नवव्या क्रमांकावर होता. मात्र आता त्याचे गुण 694 वर पोहोचले असून जोश हेजलवूडला मागे टाकत तो अव्वल गोलंदाज बनला. त्याने सरळ आठ स्थानांची झेप घेतली आहे.

Exit mobile version