| माथेरान । वार्ताहर ।
माथेरान शहरात अनेक विकासकामे सुरू आहेत. यामध्ये येथील मुख्य महात्मा गांधी रस्त्याला सुद्धा क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्याचे सुरू होते परंतु येथील उताराच्या ठिकाणी हे ब्लॉक लावू नये अशी लेखी मागणी येथील स्थानिक अश्वपालकांनी करून रस्त्यांची कामे बंद केली. यामध्ये वन ट्री हिल विभागातील रस्त्याचे काम पण बंद आहे.याकरिता या वन ट्री हिल विभागात राहणार्या स्थानिकांनी आठ दिवसांपूर्वी नगरपालिकेमध्ये रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी लेखी निवेदन दिले होते.आठ झाले तरी अद्याप काम सुरू न झाल्यामुळे अखेर या विभागातील स्थानिकांनी शुक्र.दि.24 रोजी माथेरान मधील मध्यवर्ती असलेल्या श्रीराम चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला येथील स्थानिकांनी देखील आपला जाहीर पाठिंबा दर्शविली आहे.