घोणशे घाटात भीषण अपघात

सुदैवाने जीवितहानी टळली

जळगाव – पुणे-दिघी राष्ट्रीय महामार्गाने म्हसळ्याकडे येताना घोणशे घाटात केळेवाडीच्या तीव्र उतारावर भरधाव येणारी एर्टिक कार क्रमांक MH18-BR1275 चालकाचा ताबा सुटल्याने घाटाच्या दरीत पलटी झाली. कारमध्ये एकूण 7 प्रवाशी होते. हा अपघात सायंकाळी 6.30 वा सुमारास झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. म्हसळा ग्रामीण रुग्णालयात डॉ. बेलकोने, सिस्टर प्रणाली खुल्लम, अश्विनी धोत्रे यांनी जखमीवर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठविण्यात आले.

 अपघातात जखमी झालेले पर्यटक 
नरेंद्र महाजन (26 वर्ष ),अक्षय विजय पवार (30 वर्षे ),आदित्य विजय पवार (23 वर्षे ),सनी संजय बागुल (26 वर्षे ), दिनेश संजय बागुल (28 वर्षे ),निलेश संजय भागवत (26 वर्षे ),शुभम काशीनाथ म्हस्के (30 वर्षे )सर्व राहणार धुळे
Exit mobile version