चलना बाह्य नोटांचा कागदी चुरा घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात

| वर्धा | वृत्तसंस्था |

चलना बाह्य नोटांचा कागदी चुरा घेऊन जात असताना या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. वर्ध्याच्या नागपूर-वर्धा रोड वर सिंधी येथे ही घटना घडली आहे. तर निवडणूक काळात ट्रकमध्ये चलनी नोटांचा चुरा व त्याला लागलेली आग बघून स्थानिकांमध्ये अफवांना पेव फुटल्याचेही चित्र आहे. या प्रकरणाचे गांभीर्य बघता पोलीसांकडून या घटनेची सध्या सखोल चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक उत्तर प्रदेशकडून महमार्गाने हैदराबादकडे जात असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र हा अपघात आणि त्यानंतर लागलेल्या आगीचा सध्या पोलीस तपास करत आहे. मात्र अचानक झालेल्या या अपघात आणि अपघातानंतर ट्रकला लागलेल्या आगीच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

Exit mobile version