एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

| पुणे | वृत्तसंस्था |

पुण्यातील खडकी भागात कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एकूण 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (रविवारी) सकाळी 9 वाजता हा अपघात घडला आहे. पुण्यातील खडकी भागात आज सकाळी एसटी बसने चार चाकीला धडक दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आपघातात कारचे आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने एसटी बसने कारला जोरदार धडक दिली.

Exit mobile version