मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

| माणगाव | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगांव एस.टी. स्थानकासमोर दुचाकी व टँकरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण बालाजी झोंबाडे होंडा स्प्लेंडर मोटारसायकल अतिवेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत टँकर (एनएल-01-सेडी-2227)च्या मागच्या बाजुस धडक देऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू होऊन मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भोसले करीत आहेत.

Exit mobile version