मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; टँकर चालकाचा मृत्यू

| खोपोली | प्रतिनिधी |

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत चालूच असून आज पहाटे दुसरा अपघात झालेला आहे. एका दुधाच्या टँकरने अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाच्या पोटात टँकरचे स्टिअरींग घुसल्याने जागीच मृत्यू झाला आहे.

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरून सोमवारी (दि.11) पुण्याकडून मुबंईकडे टँकर (एमएच-03-सीव्ही-9330) दूध घेऊन जात असताना एक्सप्रेस वेवरील बोरघाटात आला असता त्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात टँकरच्या केबिनचा चक्काचूर झाला असून  टँकर चालक गणेश ढगे (27) रा.महापे, एमआयडीसी, नवी मुबंई याच्या पोटात टँकरचे स्टिअरींग घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Exit mobile version