पंढरपूर-कराड रस्त्यावर भीषण अपघात

5 महिला ठार, 3 गंभीर

| सांगोला । प्रतिनिधी ।

पंढरपूर-कराड रस्त्यावरील कटफळ येथे भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली. यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत. या महिला मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकर्‍यांच्या शेतावर गेल्या होत्या. काम संपल्यानंतर दुपारी घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर-कराड रोडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव जाणार्‍या ट्रकने त्यांना उडवले. आज दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला. आयशर ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या सातही महिलांना चिरडले.

Exit mobile version