पोयनाड – नागोठणे मार्गावर भीषण अपघात

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पोयनाड नागोठणे मार्गावरील श्रीगाव रस्त्यावर आज दुपारी २ वाजताच्या सुमारास मोठा भीषण अपघात. भरधाव वेगाने येणाऱ्या इको आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार टक्कर झाली व हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती सदरील घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, इकोच्या समोरील पूर्ण भाग दबला गेला तर मोटारसायकलचा चक्काचूर झाला असून रस्त्यावर रक्ताचा सडाच्या सडा पसरला होता. थळ येथील मोटारसायकलस्वार दोन मुलांच्या भरपूर मार लागला असून त्यातील एकाची परिस्थिती चिंताजनक आहे. पोयनाड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळीचा पंचनामा केला व पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version