| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील नेरळ उमानगर भागातील जंगल भागात पत्नीला नेऊन तू आपल्या गावी चल असे सांगता तिने नवऱ्याच्या घरी गावी जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने पत्नीवर लोखंडी हत्याराने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दिव्या मोहन खुंजूर या आपल्या आईकडे नेरळ येथील उमानगर भागात राहायला आल्या होत्या. त्यांचे पती हे नऊ मे रोजी तेथे आले आणि त्यांनी पत्नी दिव्या यांना महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगून बाहेर नेले. तेथून जवळच असलेल्या स्मशानभूमीजवळील जंगलात जाऊन अजय खुजूर याने पती दिव्याला आपल्या गावी जा अशी सूचना केली. मात्र, दिव्या यांनी गावी जाण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पती अजयने पत्नी दिव्यावर जवळ असलेल्या लोखंडी रॉडच्या सहाय्याने हल्ला केला. तसेच स्वतःसोबत घेऊन आलेल्या लोखंडी चाकूच्या सहाय्याने दिव्याच्या गळ्यावर, डाव्या हातावर, डाव्या खांद्यावर वार करुन जखमी करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोसई श्री. मांडलिक करीत आहेत.