पुण्यात भररस्त्यात राडा; दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला

| पुणे | वृत्तसंस्था |

पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यात मारहाणींच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. पुणे शहरातील महंमदवाडी परिसरात असलेल्या गंगा फ्लोरेंटीना सोसायटी बाहेर किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली. वीस जणांच्या टोळक्यांनी दोन तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे.

पुण्यातील कोंडावा परिसरातील महमदवाडी येथे दोन तरुण कॉफी प्यायला आले होते. त्यावेळी त्यांनी यांच्या दुचाकीची लाईट समोर असलेल्या तरुणावर मारली, या किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्याचवेळी तेथे असलेल्या वीस जणांच्या टोळक्यांनी समोरच्या दोन मुलांना त्यांचे कपडे फाटेपर्यंत मारले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेबाबत कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version