| पनवेल | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल जवळलील कर्नाळा येथे रविवारी (दि.४) रात्री अकरा वाजताच्या सुमारास एक खासगी प्रवासी बस उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 32 प्रवासी बस खाली अडकून गंभीर जखमी झाले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस (एमएच-47-वाय-7487) दहिसरवरून सावंतवाडीला जात होती. ही बस पनवेलमधील कर्नाळा खिंडीत आली असता अती वेगामुळे बस पलटी होऊन अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले होते. या अपघातात अमोल कृष्णा तळवडेकर (वय 30 राहणार कोंडाये, राजापूर, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला आहे. तर, शंकर सावंत, लक्ष्मी घुणरे, सुरेखा सावंत, अबीठा सावंत, रीना साळस्कर, राजेंद्र साळस्कर, सानिया साळस्कर, समर्थ साळस्कर, संजय साळस्कर, जयश्री साळस्कर, सिताराम साळस्कर, सुनील धुरी, परेश धुरी, रुपेश धुरी, संदेश धुरी, दुर्गा शेटकर, भरत शेटकर, भारती शेटकर, आर्या शेटकर, स्नेहा गावकर, प्रमोद चव्हाण, प्रणाली चव्हाण, उज्वला बोडेकर, कल्पेश बोडेकर, शशिकला परब, नाविन्या सावंत, नलिनी पवार, सुनील ओनकर, रोशन गमरे, सागर कदम, रोहित तरळ, रुतिका तरळ उर्फ प्रतीक्षा मटकर असे 32 जणं जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर बस चालक पळून गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अपघात घडल्यानंतर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती.