शेडुंग टोलनाक्याजवळ जीवघेणी वाहतूक

वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई-पुणे महामार्गावर असलेले अजिवली ते पळस्पे या दोन्ही बाजूने येणार्‍या-जाणार्‍या मार्गाला जोडणारा पनवेल प्रवेशद्वार, जेएनपीटीवरून येणार्‍या-जाणार्‍या रस्त्यावर होणार्‍या मोठ्या वाहतूक कोंडीने मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

अजिवली ते पळस्पे हा रस्ता जिथे जोडतो, त्या ठिकाणी अतिक्रमणे होऊन रस्ता अरुंद होतो. जीवघेण्या वाहतुकीच्या कोंडीत अटकलेला वाहन चालक प्रवासी 1 ते 2 तास यात अटकून असतो. तांत्रिक दृष्टीने पाहिले असता रस्त्यालगत वाढणारी अतिक्रमणे ज्यात अडचण निर्माण करणारे पेट्रोलपंपाने पेट्रोल भरण्यासाठी उभे केलेले शेकडो टँकर, ट्रेलर तसेच व्यावसायिक म्हणून रेतीच्या बॅगा ठेवलेले व्यापारी, बांबू विके्रते, फर्निचर, नर्सरीवाले, रेती खडी आणणारे अनेक मालवाहतूक ट्रक, वेगवेगळ्या धंद्याच्या हातगाड्या लावल्या असून, या सर्व बाबींवर दुर्लक्ष करून प्रशासनाचा कुठलाही अंकुश यावर दिसत नसल्याने नागरिकांना होणारा त्रास भविष्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत अनेकांचा जीव घेऊ शकतो.

वाहतूक पोलिसांचे कार्यालय व गस्त अगदी हाकेच्या अंतरावर असतानासुद्धा या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे हजारो वाहन चालक व रहदारी करणार्‍या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी अनेक वेळा माध्यमातून ऐकायला पाहायला मिळतात. भविष्यातील ही असहनीय त्रासदायक असुरक्षित व अनियोजित असलेली वाहतूक कोंडी वैद्यकीय उपचाराच्या वेळी एखाद्याच्या जीव जाईल अशी आहे. अनेक वेळा माध्यमातून आवाज उचलला असतानाही काही मिनिटाच्या प्रवासासाठी दोन दोन तास उभे राहून प्रवाशांना जीव मुठीत ठेवावा लागत असल्याने आंदोलन मोर्चा करून प्रशासनाच्या निषेधार्थ नागरिकांचा असंतोष पाहता मुंबई-पुणे महामार्ग अडवल्याशिवाय स्थानिक नागरिक शांत बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांसह वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version