| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात गुरुवारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ऑटो रिक्षा आणि दुचाकीच्या धडकेत एक तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. कर्जतमधील मोठे वेणगाव परिसरात हा अपघात घडला आहे. या अपघाताची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत वेणगाव मार्गावरील मुख्य वळणावरुन जात असताना ऑटो रिक्षा आणि मोटारसायकल यांची समोरासमोर धडक झाल्यानं हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे यामध्ये नुकसान झाले आहे. या अपघातात बाळा अरुण वाघमारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, मोटारससायकल चालक संतोष हिलम आणि ऑटो रिक्षातील चालक आणि एक प्रवासी जखमी झाला आहे. जखमींवर कर्जतमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहेत.







