। पालघर । प्रतिनिधी ।
विरार पूर्वेकडील बरफपाडा परिसरात बुधवारी (दि.14) दुपारच्या सुमारास एका खदाणीत बुडून वडील आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. विनायक सितप (48)आणि त्यांची मुलगी ईकांशा सितप (15) अशी मृतांची नावे असून ते मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील रहिवासी होते. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त ते नातेवाईकांकडे आले होते. बरफपाडा परिसरातच असलेल्या एका खदानीजवळ वडील आणि मुलगी असे दोघेजण गेले. यावेळी विनायक सितप खदानीत पोहोण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. वडील पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी मुलगी इकांशा हीदेखील खदानीच्या पाण्यात उतरली. मात्र, दोघांचाही खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.







