| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथील बापलेकाचे निधन झाले. या निधनाने धोकवडे गावात शोककळा पसरली आहे. धोकवडे येथील नारायण रामभाऊ म्हात्रे यांचे महिन्याभरापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा विनायक नारायण म्हात्रे यांचे वयाच्या 50 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. एकाच कुटुंबातील बापलेकाचे निधन झाल्याने म्हात्रे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नारायण म्हात्रे हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. पक्षवाढीसाठी त्यांचे मोलाचे योगदान होते.







