| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
पेण पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य, संजय भोईर यांचे वडील धाया भोईर यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, सून, 2 मुली, जावई, नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. धाया भोईर हे अनेक वर्ष नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होते. त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, शासकीय विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. धाया भोईर यांच्या रूपाने ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची शोकाकुल प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांकडून देण्यात आली.
संजय भोईर यांना पितृशोक
