वादळी पावसामुळे मच्छिमारांमध्ये भितीचे वातावरण

आगरदांडा-दिघी बंदरात मासेमारी नौकांचा मुक्काम
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
जवाद चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील उत्तर भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे कोकण, मुंबई, विदर्भ आदी भागात मुसळधार वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून मासेमारी नौका आगरदांडा-दिघी बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत. सतत बदलत्या हवामानामुळे मच्छिमारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या चार दिवसापासून मासेमारी पुर्णतः बंद असून शेकडो नौका आगरदांडा-दिघी बंदरात उभ्या आहेत. वादळी पावसाने नौकांवरील खलाशी गारठून गेले आहेत.काहींचे धान्य देखिल भिजल्याची माहिती आगरदांडा- दिघी बंदरातून मिळाली आहे. वादळी पाऊस किती काळ राहणार याची निश्‍चित माहिती नसल्याने मच्छिमारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वादळी वातावरणाची मोठी दहशत मच्छिमारांनी घेतली असून अनेक खलाशी थंडीत कुडकुडत दिवस ढकलत आहेत.

Exit mobile version