भेंडखळ क्रिकेट अकॅडमीतर्फे आहार शिबीर

उरण । वार्ताहर ।
क्रिकेट खेळामध्ये व्यायमासोबत आहाराला खूप महत्व आहे. आहार कसा असावा याचे उच्च दर्जाचे मार्गदर्शन खेळाडूंना मिळावे, या उध्येशाने भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरणतर्फे आहार तज्ञांच मार्गदर्शनपर शिबिर पाणदीवे येथील पी. आर. पाटील इंग्रजी शाळेमध्ये आयोजित केले होत. या शिबिरात दिल्ली कॅपिटल या आयपीएल क्रिकेट टीमच्या आहार तज्ञ सायली नाईक यांनी मार्गदर्शन केले.

आहार कोणता व कसा असावा याचे उत्तम मार्गदर्शन खेळाडू व पालकांना मिळाले पालकांच्या व मुलांच्या सर्व प्रश्‍नांना सायली नाईक यांनी उत्तरे दिली. गेल्या आठवडाभरात भेंडखळ क्रिकेट अकॅडमीने उच्च दर्जाचे तज्ञ आणून फिटनेस शिबिर व आहार विषयक शिबिर अशी दोन शिबिर आयोजित करून अतिशय उच्च दर्जाचे मार्गदर्शन आपल्या खेळाडूसाठी केले. या दोन्ही शिबिराचा फायदा खेळाडूंना येत्या मोसमात होईल असे प्रतिपादन भेंडखळ क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक नयन कट्टा व अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केलं. भेंडखळ क्रिकेट अकॅडमीस भेंडखळ ग्रामपंचायतच खूप सहकार्य मिळत असे प्रतिपादन अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले. या वेळी भेंडखळ क्रिकेट अकॅडमीचे संदीप पाटील, मनोज भगत, नयन कट्टा, शरद म्हात्रे, डॉ.भूषण पाटील, रोहिदास पाटील, मनोज भगत सह खेळाडू व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version