भटक्या कुत्र्यांसाठी फिडींग केंद्र

पनवेल । वार्ताहर ।
पर्यावरण-प्राणी प्रेमी ज्योती नाडकर्णी आणि खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन यांच्या सहयोगाने खारघर, सेक्टर- 35 येथे प्रायोगिक तत्वावर भटक्या कुत्र्यांसाठी फिडींग स्टेशन सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी कुत्र्यांचे लसीकरण आणि मोफत रक्त तपासणी केली जाणार आहे.
खारघर, सेक्टर-34,35 परिसरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. रस्त्यावर भटकी कुत्रे ठाण मांडून राहत असल्याने पालक आणि लहान मुलांमध्ये भितीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांना निवांत वसाहती लगत एका शेडमध्ये उन्हाळा-पावसाळ्यात निवांत बसता यासाठी फिडींग स्टेशन उभारण्यात आले आहे. यासंदर्भात पनवेल महापालिका आणि सिडको प्रशासनाकडे रितसर अर्ज देण्यात आले आहे. फिडींग स्टेशनसाठी खारघर, सेक्टर-35 जी हाईड पार्क जवळ जागा आहे. अधिक माहितीसाठी 9619989730 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ज्योती नाडकर्णी यांनी केले आहे.

Exit mobile version