दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

। मुरूड । वार्ताहर ।

हिंदू एज्युकेशन सोसायटी संचलित ओंकार विद्या मंदीर विद्यालयाच्या मार्च 2024 च्या एसएससीचा सेमी इंग्रजीचा निकाल 100 टक्के लागला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हिंदू एज्युकेशन सोसायटीचे विश्‍वस्त मनोहर गुरव, मृदुला आबदेव, दीपाली जोशी, मनिषा फाटक, सचिव सुनील विरकुड, मुख्याध्यापिका प्रविता गार्डी पालक व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक रुद्राणी हेरंब जोशी 78.80 टक्के, द्वितीय क्रमांक सार्थक संदीप ठाकूर 77.60 टक्के, तृतीय क्रमांक आर्या सुनील बनिया 70.40 यांचा समावेश आहे. यावेळी दीपाली जोशी, मनोहर गुरव, मनिषा फाटक मुख्याध्यापिका प्रविता गार्डी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी या शाळेत बालवाडीपासून दहावीपर्यंत ज्या शिक्षकांनी संस्काराची शिदोरी देऊन आम्हाला घडविले त्यांना व शाळेला कधीच विसरता येणार नाही अशा शब्दात संवेदना व्यक्त केल्या. हिंदु एज्युकेशन सोसायटी व भोसला मिलटरी स्कूल नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शैक्षणिक वर्षापासून इ.11 वी विज्ञान (आयटीसह) शाखेचे वर्ग सुरु करणार असल्याची माहिती दीपाली जोशी यांनी दिली.

Exit mobile version