वडके विद्यालयात पदाधिकाऱ्यांचा सत्कार

| चोंढी | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील श्री. स.म. वडके महाविद्यालयात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा तसेच संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळातील सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांनी भूषविले होते.

या कार्यक्रमात संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष सुनील थळे, कायम सदस्य रवींद्र ठाकूर, कार्यवाह प्रमोद पाटील, खजिनदार राजेंद्र शिंदे, सहकार्यवाह किरण ठाकूर, मुख्याध्यापिका सुवेगा पाटील यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळातील सदस्य ॲड. प्रवीण ठाकूर, जगन्नाथ पेढवी, राजेंद्र नार्वेकर, मनोहर म्हात्रे, प्रमोद पाटील, संजय शिंदे, संदेश पाटील, जनार्दन सुरेकर, शाम काठे, राजेंद्र पाटील, शुभम ठाकूर, रवींद्र बेर्डे आणि नितीन वेलणकर यांचाही सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर संस्थेच्या शिक्षक-सेवक प्रतिनिधी लीना सचिन पाटील यांच्यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. त्यामध्ये शिक्षिका संजना म्हात्रे, अनिता थळे, स्नेहल वार्डे, पेडण्ोकर, सचिन गोंधळी, कामिनी राऊळ आणि किरण मोकल यांचा समावेश होता. या सर्व सन्मानार्थींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि वृक्षारोपणाचा संदेश देणारे रोपटे प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सुवेगा पाटील, मुख्याध्यापक संदीप पाटील, मुख्याध्यापिका घरत, मुख्याध्यापिका पावशे, उपमुख्याध्यापिका नम्रता म्हात्रे, पर्यवेक्षिका स्वागता पाटील, सत्रप्रमुख नाशिक पेढवी, सचिन बालघरे, सत्रप्रमुखा राठोड, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्षा मनिषा नांदगावकर, तसेच सर्व विभागातील शिक्षकवृंद उपस्थित होते.

Exit mobile version