मुस्लिम सोसायटी डेव्हलपमेंट ग्रुपतर्फे विद्यार्थिनींचा गुणगौरव


| सुधागड | वार्ताहर |

मुस्लिम सोसायटी डेव्हलपमेंट ग्रुप पालीतर्फे पालीतील मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवारी (दि.7) आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यात आले. सुधागड तालुक्यातील एकमेव उर्दू शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा समावेश करून घ्यावा असा आवाहन यावेळी साधुराम बांगारे यांच्याकडून पालकांना करण्यात आला.

या कार्यक्रमास रायगड फलाए तंजिमचे अध्यक्ष मुस्तफा पोंजेकर, डॉ. मुश्ताक मुकादम, डॉ. मुबश्शीर जमादार, कोकणी डॉक्टर्स असोसिएशनचे व्हॉइस प्रेसिडेंट डॉ. नसीम खान, तालुका गटशिक्षण अधिकारी साधुराम बांगारे, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये, डॉ. राबिया मुल्ला, डॉ. शमा शेख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मन्सूर अली पानसरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम सोसायटी डेव्हलपमेंट ग्रुपमधील सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version