| पाली/गोमाशी | वृत्तसंस्था |
32, रायगड लोकसभा इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या समर्थनार्थ पाली शहरातील मोहल्लामधील कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचाराकरीता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी सुरेश खैरे, विष्णू पाटील, राजेंद्र राऊत, ईम्तियाज पालकर(कोकण विभाग मराठा-मुस्लिम संघटना नेते) प्रमुख नेतेंसह पालीतील सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते, अत्यंत उत्साहात आणि एकदिलाने संविधान वाचवण्याकरिता पालीतील सर्व मुस्लिम बांधवांनी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांना बिनशर्त पाठींबा देण्यात आला. सुधागड तालुक्यात खेडोपाडी देखील गीते यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. पाली शहरातील आगरआळी, भोईआळी, खालची बाजारपेठ, देऊलवाडा येथे प्रचार करताना इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.